राज्यस्तर शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेची यशस्वी सांगता

बुलडाणा,(प्रतिनिधी): राज्यस्तर शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित सर्व खेळाडूंनी निरोगी आरोग्याकरीता सदैव खेळत रहावे व याच खेळाच्या माध्यमातुन राज्याचेच नव्हे तर देशाचे नाव सातत्याने उज्वल करावे, याकरीता मेहनत, सराव करत रहावा व यश संपादन करावे अशा गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय काये राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी खेळाडूंना दिलेल्या शुभेच्छा संदेशासह गेल्या 30 ऑक्टोंबर 2018 पासुन ते 2 नोव्हेंबर 2018 पर्यंत सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय वेटलिफ्टींग स्पधेचा शानदार समारोप समारंभ जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती क्रीडा पुरस्काराथी टी.ए. सोर तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टींग संघटनेचे प्रमोद चोळकर, संतोष सिंहासने, अनिल माहुली, तांत्रीक निवड समिती सदस्य श्रीमती उज्वला माने, मधुरा सिंहासने, प्रविण व्यवहारे, जिल्हा वेटलिफ्टींग संघटना पदाधिकारी तेजराव डहाके यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील हे उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्र भरातुन आठ विभागातुन 336 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन डॉ.निरूपमा डांगे जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा व महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टींग संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. दि. 2.11.2018 रोजी झालेल्या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन मान्यवरांचे हस्ते करण्यात येऊन, खालील खेळाडूंना त्यांच्या वजन गटनिहाय, मेडल्स् प्रदान करण्यात आले. 19 वर्ष मुले 102 किलो वरील वजनगटात प्रथम क्रमांक कोल्हापूर विभागाचा अंकीत अरुण खुरुपे, द्वितीय क्रमांक औरंगाबाद विभागाचा मो.सलमान मो. अखिल तर तृतीय क्रमांकाचा अमरावती विभागाचा काजी अमरुद्दीन काजी खैरुद्दीन यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेत बेस्ट लिफ्टर म्हणून 17 वर्षाआतील मुलांमध्ये नाशिक विभागाचा अभिषेकमहाजन तर मुलींमध्ये कोल्हापूर विभागाची निकीता कमलाकर आणि 19 वर्षाआतील मुलांमध्ये कोल्हापूर विभागाचा अभिषेक निपाणे तर 19 वर्षाआतील मुलींमध्ये क्रीडा प्रबोधिनीची ऋतुजा पाटील यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे 19 वर्षाआतील मुलांमध्ये सांघीक विजेतेपद नाशिक या विभागास तर उपविजेतेपद पुणे विभागास प्राप्त झाले आणि 19 वर्षाआतील मुलींमध्ये सांघीक विजेतेपद कोल्हापूर विभाग तर उपविजेतेपद नाशिक विभागाने प्राप्त केले. त्याचप्रमाणे 17 वर्षाआतील मुलांमध्ये सांघीक विजेतेपद मुंबई या विभागास तर उपविजेतेपद पुणे विभागास प्राप्त झाले आणि 17 वर्षाआतील मुलींमध्ये सांघीक विजेतेपदाचा मान कोल्हापूर विभाग तर उपविजेतेपदाचा मान पुणे विभागास मिळाला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget