नगर-पुणे महामार्गावरील ढाब्यांवरचे बसथांबे बंद करा


नगर । प्रतिनिधी -
नगर-पुणे महामार्गावर परिवहन महामंडळाच्या एसटी बसगाड्या अनधिकृतरित्या ढाब्यांवर थांबवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा खर्च होऊन मनस्ताप सहन करावा लागतो. एसटीचे काही अधिकारी अनधिकृत हॉटेल चालक-मालकांकडून चिरीमिरी घेऊन बसचालकांना अनधिकृत हॉटेलवर बसेस थांबविण्यासाठी दबाव आणतात. चालक व वाहकाने बस अनधिकृत थांब्यावर थांबली नाही तर अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देतात, असा आरोप करून तातडीने हे अनधिकृत ढाब्यांवरील हे अनधिकृत थांबे बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे राज्य परिवहन सेनेने दिला आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना वेळेचे खूप महत्त्व असते. परंतु ढाब्यांवर बस थांबल्यावर नाईलाज होतो. प्रवाशांना अवाजवी दर लावून ढाबाचालक लुटतात. अन्न व खाद्यपदार्थांचा दर्जाबाबतही तक्रारी आहेत.
परिवहन कामगारांचे हित जोपासणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. परिवहन कामगार असलेल्या चालक-वाहकांवर अशा प्रकारचा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना कदापि सहन करणार नाही. यात आपण लक्ष घालून 15 दिवसांत ढाब्यांवरील अनधिकृत बसथांबे बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget