घाटबोरी येथील ग्रामसभा शांततेत पडली पार सरपंच चनेवार यांचा विकास कामावर भर


घाटबोरी,(प्रतिनिधी): मेहकर तालुक्यातील गट ग्रामपंचायत घाटबोरी येथे सरपंच गजानन श्रीरामआप्पा चनेवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेत पार पडली. या ग्रामसभेत स्वच्छता हीच सेवा हि संकल्पना राबविणे, वृक्ष लागवड करणे, घर कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर वसुली, संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करणे, जानेफळ येथील धर्तीवर स्मशानभूमीचा विकास करणे, 14 वा वित्त आयोग कृती आराखड्यानुसार कामे करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतला प्राप्त तक्रारीचे वाचन करणे व तक्रारी निकाली काढणे या व इतर विषयावर चर्चा करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात सरपंच चनेवार यांनी गावाचा विकास कार्यक्रमावर जोर दिला. प्रसंगी ग्रामसभा म्हणजे 3 तासांचा गावकरीचा खेळ या संकल्पनेतून गावकर्‍यानी बाहेर येवून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध होवून आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यास आम्ही तत्पर आहोत असे सांगीतले. भारतीय लोकशाहीतील पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे ग्रामसभा हा होय. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ग्रामसभेत गोंधळ होत असल्यामुळे गावाचा विकास होत नाही, किंवा ज्या कामासाठी ग्रामसभा बोलाविल्या जाते त्या विषयावर चर्चा न होता, विषयांतर होऊन गावागावात वैमनस्य निर्माण होतात. व विकास कामास खीळ बसते, अश्या अनेक मुद्यांना सरपंच यांनी हात घालून गावातील चालू असलेली विकास कामे व येणारी कामे यावर चर्चा केली. यावेळी सरपंच यांनी सर्व जातीधर्मात एकोपा साधण्याचे आवाहन केले. ग्राम सभेला मोठया संख्येनी उपस्थिति होती. प्रामुख्याने माजी सरपंच विष्णुपंत पाखरे, दिलीप पाटील नवले, रविकुमार चुकेवार, विठ्ठल महाराज, प्रल्हादआप्पा चुकेवार, मनिराम राठोड, भिमराव मंजुळकर, बाळू मडावी, प्रेमसिंग राठोड, दिनकर अंभोरे, संतोष अवसरमोल, बिट्टुआप्पा चुकेवार, सुधिर घोडे, तानाजी नवले, सुरेश राठोड, आनंदा नवले, वसंता जाधव, सुभाष काशीद, गजानन झरकर, सुभाष राठोड, विलास अंभोरे, सुधीर कोरडे, गौतम अंभोरे, यशवंता अंभोरे, मधुकर अंभोरे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, तलाठी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget