बोरुडे यांच्या सामाजिक कार्याचा भुजबळ यांच्याकडून गौरव


ओबीसी अधिकारी, कर्मचारी सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरुडे यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रामाणिक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जोरावरच सरकारचा कारभार सुरु आहे. अधिकारी व कर्मचारी हे प्रत्यक्षात सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवित आहेत. मात्र या सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्‍न असून, ते सोडविण्यासाठी सरकार कमी पडत आहे. संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्‍न सुटणार असल्याची भावना समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. 

ओबीसी अधिकारी, कर्मचारी सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भुजबळ बोलत होते. याप्रसंगी समता परिषदेचे पश्‍चिम विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर, प्रा.माणिक विधाते, संजय गारुडकर, सुभाष लोंढे आदी उपस्थित होते.

पुढे भुजबळ म्हणाले की, सरकारी कर्मचार्‍यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून संघटनेच्या माध्यमातून लढा उभारुन आपले प्रश्‍न सोडवावे. बोरुडे यांनी वंचित घटाकातील रुग्णांसाठी मोठी चळवळ उभी केली असून, नेत्रदान चळवळीत त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
जालिंदर बोरुडे यांनी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करुन सामाजिक कार्यात सक्रिय असणार्‍यांना संधी दिली जाणार आहे. सभासदांच्या पाल्यांसाठी सांस्कृतिक भवन, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त करीत सामुदायिक विवाह, रोजगार मेळावे घेणार असल्याचे सांगितले. तसेच फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील अंध रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी चालू असलेल्या शिबीराची व हाती घेण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती मोहिमेची माहिती दिली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget