जिल्ह्यात बारा लाख मुलांना गोवर लस देणार

नगर । प्रतिनिधी -
केंद्र सरकारने 2020 पर्यंत गोवर आजाराचे निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार गोवर रुबेला लस विविध राज्यांतील नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येत आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत 15 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 12 लाख 37 हजार 218 मुलांना लस दिली जाणार आहे. नगर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून लसीकरणास सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यात ही मोहीम चार ते पाच आठवड्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार आहे. आरोग्य व शिक्षण विभागाच्या मदतीने राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यांत लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतील. त्यानंतर उर्वरित लाभार्थींचे गोवर रुबेला लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण उपकेंद्र सत्राच्या ठिकाणी करण्यात येईल. या मोहिमेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीची सभा नुकतीच घेण्यात आली. यामध्ये मोहिमेबाबत प्रशिक्षण, कृती आराखडा, मनुष्यबळ उपलब्धता याबाबत आढावा घेण्यात आला.
जिल्हास्तरावर मोहिमेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 12 लाख 37 हजार 218 लाभार्थींच्या लसीकरणासाठी शाळेमध्ये 4 हजार 660, अंगणवाडी केंद्र 2 हजार 747, मोबाइल टीम 80, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय 1 हजार 224 असे एकूण 8 हजार 711 सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget