विटभट्टीवरील मजुराचा शॉक लागल्याने ठार


परळी, (प्रतिनिधी):- येथील विटभट्टीवर काम करणार्‍या एका ३५ वर्षीय मजुराचा शॉक लागून रात्री उशिरा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरापासुन जवळच असलेल्या विटभट्टीच्या परिसरात घडली. परळी येथील ज्ञानेश्‍वर नरसिंग घटमल (वय ३५, रा.वडार कॉलनी) हे शहराजवळ असलेल्या एका विटभट्टीवर मजुर म्हणून कामाला होते. 

काल रात्री नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर ज्ञानेश्‍वर घटमल हे विटभट्टीजवळच असलेल्या रुममध्ये गेले. त्याठिकाणी अचानक विजेचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget