Breaking News

मोफत ह्रदयविकार,श्वसनविकार, न्युरोपॅथी शिबिर-डॉ.तिडके


बीड (प्रतिनिधी) अल्पावधीत नावलौकिक मिळविलेल्या बीड येथील स्पंदन डायबेटिक आणि सर्जिकल हॉस्पिटलच्या वतीने दि.३० नोव्हेंबर २०१८ रोजी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दमा, श्वसनविकार, ह्रदयविकार, रक्तदाब, डायबिटीज, न्ंयुरापॅथी, सांधेदुखी आदी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाचे संचालक डॉ. राम तिडके व डॉ.सौ. कल्पना तिडके यांनी केले आहे. यासंदर्भात माहिती अशी की, बीड शहरातील नामांकित जनरल सर्जन डॉ. राम तिडके व ह्रदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ.सौ. कल्पना तिडके यांनी स्पंदन डायबेटिक व सर्जिकल हॉस्पिटल सुरु केेले आहे.

 अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तज्ञ डॉक्टरच्या सेवेमुळे या रूग्णालयाने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून डॉ. तिडके यांनी गरीब आणि सामान्य रूण्णांसाठी मोफत रोगनिदान आणि उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रूग्णांची अत्याधुनिक मशिनव्दारे तपासणी केली जाणार आहे. दमा व श्वसन विकार, ह्रदयरोग व रक्तदाब लक्षणे, मधुमेहाची लक्षणे, न्युरोपॅथी आजाराची लक्षणे असणार्या तसेच पायांनामुंग्या येणे, पाय बधीर होणे, पायांची आग होणे, पायांना सुया टोचल्यासारखे होणे, अंगाची आग होणे, अशी लक्षणे असणार्या रुग्णांंनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी स्पंदन हॉस्पिटल रेणू हॉस्पिटलसमोर, बार्शी रोड, बीड येथील भ्रमनध्वनी , ९८३४५४८५०८ अथवा दूरध्वनी क्र. ०२४४२/ २२३५७७ यावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.