विजय सोनवणे पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित; चिपळूण येथील संमेलनात होणार पुरस्कार प्रदान


कुळधरण/प्रतिनिधी
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिले जाणारे पत्रकार प्रेरणा पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये राज्यातील पाच पत्रकारांची निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील खेड येथील पत्रकार विजय सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. चिपळूण येथे 13 व 14 सप्टेंबर रोजी पार पडणार्‍या राज्यव्यापी मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या मेळाव्यादरम्यान बॅक वॉटर सागरी सफर, परिसंवाद व त्यातून वैचारिक मेजवाणी, पर्यटन आधारित पुस्तक प्रकाशन, डॉक्यूमेंटरी फिल्म प्रदर्शन, लोककलांचे सादरीकरण आदींचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनासाठी राज्यातील 36 जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांचे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्याचे मकरंद भागवत यांच्या नियोजनाखाली हे संमेलन पार पडणार आहे. संघटनेचे यासीन पटेल, नितिन भागवत, राजेंद्र शिंदे, विकास कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तसेच केंद्रीय व प्रदेश कार्यकारीणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोनवणे यांच्या निवडीबद्दल संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी विठ्ठल मोघे, सोमनाथ गोडसे, किरण जगताप तसेच कर्जत तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget