शशिकांत गटकळचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत यश


बेळपिंपळगाव/प्रतिनिधी
बेलपिंपळगाव येथील शशिकांत गटकळ यांची 2017 ला घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत सहाय्यक रासायनिक विश्‍लेषक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा सामान राज्य सेवा गट ब (राजपत्रित) या पदावर त्यांची निवड झाली आहे. 

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करून हे पद मिळवले घरची परिस्थिती बेताची होती. आई वडील यांनी शेती करून मुलाचं शिक्षण पूर्ण केले, सध्या गटकळ हे स्वतः नोकरी करून शिक्षण पूर्ण करून सध्या रक्तातील हिमोग्लोबिन या विषयावर अभ्यास करत असून लवकरच त्यांना यात देखील डॉक्टरेट ही देखील पदवी मिळणार आहे. शशिकांत गटकळ यांची निवड झाली ही बातमी गावात समजली तेव्हा गावात एक आनंदाची लाट पसरली गावाच्या वैभवात अजून एक मानाचा तुरा रोवला त्यांच्या निवडी बद्दल गावातील ग्रामपंचायत, सोसायटी, शिवप्रेमी प्रतिष्ठान, हनुमान पतसंस्था, विराट प्रतिष्ठान, डॉ बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ यांनी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget