बेलापुर ते परळी रेल्वेमार्गाचे फक्त महाप्रबंधकाचे केवळ आश्‍वासनेच


कूकाणा/प्रतिनिधी 
याबाबत माहिती अशी की बेलापुर नेवासा शेवगाव गेवराइ परळी या रेल्वे मार्गाचे चुकीच्या मार्गाने (बेलापुर नेवासा शेवगाव पाथर्डी राजुरी रायमोह बीड) सर्वेक्षण करुण न परवडनारा सर्वे अहवाल सादर केला होता या विरोधात कुकाना येथील नागरिकांनी 1 डिसेम्बर 2017 ते 7 डिसेम्बर 2017 या कालावधीत अमरण उपोषण केले उपोषणाची दखल घेत रेल्वेचे उप महाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी जून 2018 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करुण अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवू असे लेखी दिले तसेच मुख्यमंत्री यांनीही स्वतः लक्ष घालतो असे लेखी देऊन अश्‍वासीत केले होते 

जून 2018 ची मुदत संपल्यानंतरही सर्वे प्रगतीपथावर असल्याची माहिती महाप्रबंधक कार्यालयातून मिळाली यावर कुकाना येथील रितेश भंडारी प्रकाश देशमुख प्रभाकर खंडागळे राधेश्याम बोरुडे यांनी 20 ऑगस्ट 2018 रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावर मुख्यमंत्री यांनी या रेल्वे मार्गासाठी राज्याचा खर्चाचा वाटा उचलण्याचे पत्र 8 दिवसात केंद्र सरकारला दिले जाइल असे अश्‍वासीत केले अडीच महीने उलटुनही पत्र अद्द्यापपर्यंत दिले नसल्याचे रितेश भंडारी यांनी सांगितले आत्म दहनाच्या घटनेनंतर दि 7/9/2018 रोजी पुणे येथे रेल्वेचे महाप्रबंधक व नगर पुणे जिल्हयातील खासदारांची बैठक संपन्न झाली या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी या मार्गाच्या सेर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला यावर महाप्रबंधक यांनी 30/9/2018 पर्यंत सर्वे अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविला जाइल असे खा लोखंडे यांना लेखी दिले ही मुदत संपल्यानंतर रितेश भंडारी यांनी अहवालाबद्दल विचारणा केली असता सर्वेक्षण प्रगतीपथावर असल्याचे पत्र भंडारी यांना मिळाले या पत्रावरुण मुख्यमंत्री यांच्यासह महाप्रबंधकांनी जनतेसह खासदारांची फसवणूक केली आहे येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी बेलापुर परळी रेल्वेमार्ग कळीचा मुद्दा ठरणार आहे गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाबाबत लढा सुरु आहे परंतु लोकप्रतिनिधींचे त्यात लक्ष नसल्याने येणार्‍या लोकसभा निवडणुकीत शिर्डी व नगर दक्षिण च्या लोकप्रतिनिधींना जनता जाब विचारणार आहे दिवाळीनंतर या रेल्वेमार्गासाठी पुन्हा आंदोलनाची दिशा ठरविलि जाइल या आंदोलनात जनतेने रस्त्यावर उतरून सामिल होण्याचे अवाहन रितेश भंडारी यांनी केले आहे 
 
जून 2018 च्या मुदतीनंतर सप्टेंबर 2018 ची मुदतवाढ घेतली ती मुदत पूर्ण होऊनही सर्वे पूर्ण झालेला नाही दिवाळीनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. शासनाने व रेल्वेने आम्हाला कायदे हातात घेण्यास भाग पाडू नये.
रितेश भंडारी कुकाणा

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget