Breaking News

जय महेश कारखान्यावर शेतकर्‍यांचा जनावरांसह ठिय्या


माजलगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गाळप हंगामातील बील शेतकर्‍याने चुकते केले नाही. या बिलाच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी कारखान्याच्या गेटसमोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केले.

पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने मागील हंगामात गाळप केलेल्या उसाचे बिल थकविले आहे. कारखान्याचा यावर्षीचा गाळप हंगाम बुधवारी सुरु झाला. मात्र, मागील वर्षीचे बील अदा केल्याशिवाय गाळपास सुरूवात होऊ देणार नाही अशी भूमिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी घेतली. यावेळी शेतकर्‍यांनी गेटवरचजनावरांस ठिय्या आंदोलन केले.