Breaking News

माजलगाव कृषी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन

माजलगाव (प्रतिनिधी)- सूक्ष्मसिंचन योजनेचे २०१३-१४ या वर्षातील प्रलंबित अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी तालुका कृषी कार्यालयावर पिंपरी खुर्द येथील शेतकर्‍यांच्या वतीने शुक्रवारी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील शेतकजयांनी २०१३-१४ मधील सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान मागील तीन वर्षांपासून मिळत नाही.
याबाबत वारंवार निवेदन देउनही कृषी कार्यालयाकडून दखल घेण्यात येत नाही. २८ जून २०१८ रोजी ही निवेदन देण्यात आले होते तरी देखील याची दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी तालुका कृषी कार्यालयावर ढोल बजाओ आंदोलन शेतकजयांच्या वतीने करण्यात आले. पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नाही. गेंड्याची कातडी ओढलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना जाग येण्यासाठी शेतकजयांनी आगळेवेगळे आंदोलन केले आहे. निवेदनावर परमेश्वर डाके, दीपक डाके, गणेश डाके, नंदाबाई डाके, डाके, विलास डाके यांच्या स्वाक्षजया आहेत.