ट्रॅक्टर खरेदीसाठीचे साडेतीन लाख रुपये चोरट्यांनी लांबविले


परळी (प्रतिनिधी)- अंबाजोगाई रोडवरील ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍याच्या गाडीतून चोरट्यांनी ३ लाख ६० हजारांची रक्कम लांबविली. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याला आर्थिक फटका बसला आहे. पंडित राठोड या शेतकर्‍याला दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांनी अंबाजोगाई येथील एका बँकेतून रक्कम काढली आणि भाड्याने जीप करून परळी येथे आले. 

अंबाजोगाई रोडवरील गोविंद ट्रॅक्टर या शोरूमसमोर त्यांनी रक्कम गाडीतच ठेवली आणि आतमध्ये गेले. यावेळी गाडीजवळ कोणीच नसल्याची संधी साधून त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी गाडीचा काच फोडला आणि ३ लाख ६० हजार रुपये असलेली बॅग उचलून घेतली आणि पोबारा केला. शोरूममध्ये पैसे जमा करण्याच्या उद्देशाने पंडित राठोड रक्कम घेण्यसाठी गाडीकडे आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आणि सोबतच्या व्यक्तींनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते सापडले नाहीत. अखेर त्यांनी परळी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली. ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न तर भंगलेच, पण ऐन दिवाळीत शेतकर्‍याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget