शिवसंग्राम मिशन- २०१९ यशस्वी करणार-प्रभाकर कोलंगड


बीड :(प्रतिनिधी) आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांचे लक्ष डोळयासमोर ठेवुन शिवसंग्राम आपली प्रभावी रणणिती ठरवत आहे. आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शना खाली विविध आघाडयावर तरूण, तडफदार कार्यकर्त्यांची निवड करून शिवसंग्राम आगामी काळात मुसंडी मारणार आहे. आ. मेटे यांचे सामाजिक कार्य व राजकारणाच्या माध्यमातुन विकास कामांना दिलेली गती यामुळे शिवसंग्राम बीड जिल्हयातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचली आहे. 

कार्यकर्त्यांचे निर्माण झालेले जाळे मिशन-२०१९ यशस्वी करणार हे निश्चित असे प्रतिपादन शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी केले. काल आ. विनायकराव मेटे यांच्या आदेशावरून बीड शहराचे माजी शहराध्यक्ष ऍड. राहुल मस्के यांना बीड जिल्हा कार्यकारणीत समाविष्ट करून जिल्हयाचे सरचिटणीस पद व संघटन कौशल्य व सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेवुन केज विधानसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणुन नेमणुक करून महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. अजय सुरवसे यांची युवक जिल्हाध्यक्ष म्हणुन व राजेंद्र आमटे यांची विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड केली आहे. या निवडीबद्दल या पदाधिकार्यांचा शिवसंग्राम भवन येथे सत्कार करण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget