भिडेवाडयाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या : तांबे


पारनेर/प्रतिनिधी
महात्मा फुले युवा दलाच्या वतीने संपूर्ण राज्यात स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम अभियानास महात्मा फुले युवा दलाचे गणेशभाऊ तांबे, महेश शिंदे, महात्मा फुले युवा दलाचे योगेश भुजबळ, अजय लोंढेे, गणेश मुळे, सोमा गाडेकर, अमोल मोकाते, निखिल दळवी, अनिकेत व्यवहारे, अजय मेहेर, अक्षय मंदिलकर, नचिकेत लोंढे, सिद्धांर्थ पटेकर, नवनाथ वैराळ आदि उपस्थित होते. महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केली.

 त्या वाड्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने लवकरात लवकर भिडे वाडयाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्यात येईल. आता महात्मा फुले युवा दल व सर्व फुले प्रेमी शांत बसणार नाहीत. शासनाने आता आमचा अधिक अंत पाहू नये. अहमदनगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्वाक्षर्‍या करून भिडे वाडयाला राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम अभियानात सहभागी होऊन जास्तीत-जास्त स्वाक्षर्‍या करा. असे आवाहन महात्मा फुले युवा दलाचे गणेशभाऊ तांबे यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget