धूत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची पथनाट्याद्वारे ‘देहदान’ विषयी जनजागृती

नगर । प्रतिनिधी -
देहदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, याद्वारे अनेक गरजू लोकांचे प्राण वाचू शकतात. मात्र या विषयी सर्वसामान्यांमध्ये असलेल्या भ्रामक समजुती व गैरसमज, अंधविश्वास दूर व्हावेत या हेतूने अवयवदान, त्याचे महत्व, मानसिकता बदलण्याची गरज या विषयी जनजागृती करणारे पथनाट्य रामकृष्णच्या इयत्ता 9 वीतील मुलांनी सादर केले. अवयव दानाचे महत्व सांगणारे हे पथनाट्य पाहण्यासाठी बुरुगावरोड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व धार्मिक परीक्षा बोर्ड चौकात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या पथनाट्याबरोबरच रुबेला अर्थात गोवर लसीचे महत्व सांगून ती लहान बालकांना योग्य वेळी देण्याचे आवाहन करण्यात आले. लस कुठे उपलब्ध असेल, त्याचे फायदे या विषयाची पत्रके यावेळी वाटण्यात आली. याप्रसंगी परिचारिका छाया शिरसाठ, कविता खिलारी, प्रशासन अधिकारी संजय मेहेर, विस्तार अधिकारी पालवे, प्राचार्या सौ.गीता गिल्डा, सौ.राधिका जेऊरकर, सौ.अंजना पंडीत, सौ.रोथेल लोंढे, श्रेयसकुमार गुंडू, सौ.उमा जोशी उपस्थित होते.प्राचार्य गीता गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मुलांच्याद्वारे अवयव दानाची चळवळ उभारून पथनाट्याद्वारे जनजागृतीच्या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गांधी, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, मोहनलाल मानधना, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर यांनी कौतुक केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget