Breaking News

अखेर आरेगांव व कनका गावाला मिळाले रोहीत्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कार्यकारी अभियंता यांच्या दालनात केला बैठा सत्याग्रह


डोणगाव,(प्रतिनिधी)ः मेहकर तालुक्यातील आरेगांव व कनका बु. येथील शेतकर्‍यांच्या शेतातील रोहीत्र जळाल्यामुळे रब्बीचया पिकांना पाणी देणे कठीण झाले होते. यासाठी महावितरणचे उपविभागीय अभियंता नाईक व डोणगांव येथिल अभियंता काळबोंडे, मालोकार, यांना अनेक वेळा शेतकर्‍यांनी विद्युत रोहीत्र मिळण्याची मागणी करुन सुध्दा विद्युत रोहीत्र मिळत नसल्याने शेवटी 1 नोव्हेंबर रोजी महावितरणचे कार्यकारी अभियंता खामगाव येथे येऊन शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. ज्ञानेश्‍वर टाले, जिल्हा अध्यक्ष कैलास फाटे सह नितीन अग्रवाल, अनिल ठोकळ, ओम ठोकळ सह असंख्य शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यकारी अभियंता खामगाव यांच्या दालनात बैठा सत्याग्रह सुरू केला. 

जोपर्यंत विद्युत रोहीत्र मिळत नाही तोपर्यंत दालनातुन उठणार नाही अशी भुमिका घेतली. त्यामुळे अधिकार्‍यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर स्वाभिमानीच्या या आक्रमक पवित्रा पाहून तात्काळ विद्युत रोहीत्र उपलब्ध करुन दिले. त्यामुळे दोन्ही गांवामध्ये शेतकर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागला.यावेळी ज्ञानेश्‍वर तायडे, शंकर मेंटागळे पिंटु टाले गजानन मानवतकर,कडुभाऊ काळे,सतिश तायडे,गणेश टाले,रामु सुर्वे,डव्हळे मामा,नजिर खा पठान,सह शेतकरी उपस्थित होते.