Breaking News

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी ऋतुजा गर्जेची निवड

आष्टी/प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचानालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांचे सयुंक्त विद्यमाने दि. 31 ते 3 दरम्यान छञपती शिवाजी स्टेडियम खासबाग मैदान कोल्हापूर येथे फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी 17 वर्ष वयोगटात मुलींच्या फुटबॉल संघाने चौथा क्रमांक पटकावला या संघात शुभांगी बोडखे, श्‍वेता सायकड, सुजाता बोडखे, मयुरी जमदाडे, प्रज्ञा घुले, ऋतुजा गर्जे, निकिता साळुंके, संचिता गर्जे, महेक सय्यद, निकिता बडे, पूजा खाडे, कोमल गर्जे, साक्षी सांगळे, समीक्षा शेंडे, भक्ती बोडखे, हर्षदा गोल्हार ,श्रुती वारे, दीक्षा निकाळजे, या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 

या संघातील ऋतुजा गर्जे या खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक अंकुश निमोणकर, प्रा.मोहन धोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ.भीमराव धोंडे ,प्राचार्य शिवाजी वनवे ,उपप्राचार्य भाऊसाहेब ढोबळे, प्रशासन अधिकारी डॉ डी. बी. राऊत, शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, विमल बोरुडे , रेखा फुले, मेहेर ,ताम्हणे, प्रा.संजय शेंडे, नालकोल यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.