व्यापार्‍यास वीस लाखाला गंडविले.


बीड, (प्रतिनिधी):- परळी शहरातील अरुणोदय मार्केटमधील दोन गाळ्यांच्या विक्रीचा व्यवहार करुन ईसारापोटी २० लाख रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे खरेदी करुन न देता व्यापार्‍याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यापारी बद्रीनारायण बाहेती यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस ठाण्यात बालकिशन बाहेती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परळी येथील व्यापारी बद्रीनारायण छगनलालजी बाहेती यांनी नगरपरिषद वार्ड नं.६ अनुक्रमांक १७०६, घर नं.१०३७, सिटी सर्व्हे नं.१६८/१ मधील अरुणोदय मार्केट येथील दुकान गाळा क्र.२६ व २७ खरेदी करण्याचे ठरविले होते. त्यानुसार बद्रीनारायण बाहेती व ज्यांच्याकडून गाळे खरेदी करावयाचे आहेत ते बालकिशन बाहेती या दोघांमध्ये व्यवहार ठरला होता. दोन गाळे ३६ लाख रुपयांमध्ये विक्रीचा व्यवहार ठरल्यानंतर बद्रीनारायण बाहेती यांनी इसारापोटी बालकिशन मुरलीधर बाहेती यांना २० लाख रुपये दिले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी खरेदी करुन दिले नसल्याने आपला विश्‍वासघात करुन फसवणूक केल्याची फिर्याद बद्रीनारायण बाहेती यांनी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात बालकिशन बाहेती यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४०६ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि.गित्ते हे करीत आहेत. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget