Breaking News

विखेंच्या गाडी ताफा अडविल्याच्या घटनेचा : काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध

नेवासा/प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखेंच्या गाडीचा ताफा अडविल्याच्या घटनेचा नेवासा येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी निषेध सभा घेऊन वरील घटनेचा निषेध करण्यात आला. नेवासा पंचायत समितीच्या गेटजवळ निषेध सभेपुर्वी देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसील कचेरीवर काँगेस कार्यकर्त्यांनी चालत जाऊन वरील घटनेच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. 

काँग्रेस कमिटीचे बाळासाहेब भदगले, संजय सुखधान यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील हे 30 ऑक्टोबर रोजी आपल्या ताफ्यासह जालना येथुन औरंगाबादकडे येत असतांना त्यांच्या ताफ्यास मराठवाडयातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अनधिकृतरीत्या बेकायदेशीर पणे रोखून त्यांना काळे झेंडे दाखविले होते. याचा निषेध नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला. राज्याचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील हे विविध प्रश्‍नाबाबत राज्यभर फिरत असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असून देखील त्यामध्ये कसूर केला गेला हे काम हेतुपुरस्सर झाले असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. व युती सरकारचा जाहीर निषेध केला. जायकवाडीचे पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन लढा उभा करावा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब भदगले, संजय सुखधान, कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब अंबाडे, जि.प.सदस्य बाळासाहेब देवखिळे, निवृत्ती काळे पाटील, दिलीपराव सरोदे, जाकिरभाई शेख, रमेश जाधव, दिलीपराव वाकचौरे, संभाजी पवार, बाळासाहेब पवार, अशोक वाकचौरे, अविनाश सोनवणे, अक्षय देवखिळे, समीर भदगले, प्रशांत वाबळे, रमेश पाटील, रमेश काळे, श्रीकांत अंबाडे, स्मिता अंबाडे, शिलाताई देवखिळे, शालिनीताई सुखधान, मनीषा वाघ, तय्याबबी शेख, तात्या कदम, आरगडे आदी उपस्थित होते.