बर्गेवाडी येथे विविध कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न


कर्जत/प्रतिनिधी 
बर्गेवाडी येथे दि. 4 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे तसेच नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या सहकार्याने व नगरसेवक बापुसाहेब नेटके यांच्या विशेष प्रयत्नाने विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.

 यावेळी बर्गेवाडी येथे अंतर्गत गटार लाईन करणे. बर्गेवाडी पुल ते बर्गेवाडी चौकपर्यंत रस्ता दुहेरीकरण करणे. बर्गेवाडी पूल ते बर्गेवाडी चौक पर्यंत स्ट्रीट लाईट पोल उभे करून एलईडी दिवे बसविणे डिव्हायडर तयार करून त्यामध्ये झाडे लावणे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणे. बर्गेवाडी येथील पुलाची उंची वाढवून डांबरीकरण करणे. बर्गेवाडी येथे सुसज्ज अमरधाम तयार करणे. बर्गेवाडी येथे अंतर्गत डांबरीकरण करणे. बर्गेवाडी येथे अंतर्गत पाणी पुरवठा वितरण लाईन करणे, कर्जत वरून बर्गेवाडीला फिल्टर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. ऐन दुष्काळाच्या काळात पाणी टंचाई दूर करण्यासाठी व मा.बापुसाहेब नेटके यांनी दिवाळीनिमित्त बर्गेवाडी ग्रामस्थांना फिल्टर पाणी पुरवठा योजनेची भेट दिली.त्याबद्दल बर्गेवाडी ग्रामस्थांचे वतीने नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलुमे, नामदेव राऊत, हर्षदा काळदाते, वृषाली पाटील, मनिषा सोनमाळी, लालासाहेब शेळके ,मंगल तोरडमल , नाना कचर, संतोष मेहेत्र, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, संतोष समुद्र याचे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी निलेश दिवटे सर्व ग्रामस्थ बर्गेवाडी व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget