जळगाव-सांगलीप्रमाणेच नगरमध्येही परिवर्तन होणार


नगर । प्रतिनिधी -
पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव व सांगलीप्रमाणे नगरमध्येही परिवर्तन होऊन भाजपची मनपात एकहाती सत्ता येईल. जनतेला आता विकास पाहिजे आहे. राज्याचा व शहरांचा विकास भाजपच करू शकतो हे आता जनतेला पटले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनता भाजपाच्या मागे उभी आहे. खासदार दिलीप गांधी यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. यांचे हात बळकट करण्यासाठी मी प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

ना. कांबळे यांनी आज सकाळी नगरला धावती भेट दिली. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

खासदार गांधी यांनी मंत्री कांबळे यांचे स्वागत केले. यावेळी गटनेते सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, कोषाध्यक्ष चेतन जग्गी, श्रीकांत साठे, सभापती बाबासाहेब वाकळे, केडगाव मंडल अध्यक्ष शरद ठुबे, अजय ढोणे, कैलास गरजे, मिलिंद भालसिंग, बबन गोसकी, नितीन जोशी, मनीष साठे, रोशन गांधी, उमाप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार दिलीप गांधी यांनी मंत्री कांबळे यांना नगरमधील मनपा निवडणूक व भाजपने प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार दिल्याची माहिती सांगून निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ द्यावा अशी विनंती केली.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ना. कांबळे यांनी प्रचारास येण्याचे मान्य केले. प्रास्ताविक सुवेंद्र गांधी यांनी केले. आभार चेतन जग्गी यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget