Breaking News

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील ४ खेळाडूंची निवड


बीड (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी बीडच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडू नयन बारगजे, अभिषेक शिंदे , पारस गुरखुदे व प्रणवकुमार सिरसाट या चौघांची महाराष्ट्र शालेय तायक्वांदो संघात निवड झाली आहे, अशी माहिती प्रशिक्षक अविनाश बारगजे यांनी दिली आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा २०१८ विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे पार पडल्या.या राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये राज्यभरातील जवळपास ७०० खेळाडूंनी १४, १७ व १९ वर्षाखालील गटात सहभाग नोंदवला. १४ वर्षाखालील ३८ किलोंवरील वजनगटात पोदार इंटरनॅशनल स्कूलची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खेळाडू नयन अविनाश बारगजे हीने सुवर्णपदक जिंकले. सेंन्स इंग्लिश स्कूलचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू अभिषेक बाळू शिंदे याने १७ वर्षाखालील मुलांच्या ४८ किलो वजनगटात तिसरे सुवर्णपदक जिंकले. केएसके महाविद्यालया चा पारस गुरखुदे याने ६३ किलो वजनगटात तर भोसला सैनिकी शाळेचा व मुळ बीडच्या प्रणवकुमार दत्ता सिरसाट याने १९ वर्षाखालील ४५ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले.