Breaking News

अनामप्रेमच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचे पैसे वाचवून मदतीचे आवाहन


दिवाळी हा सण आनंद देण्याचा आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये शारीरिक आव्हान आहे त्यावर स्वार झालेल्या मुला-मुलींच्या सोबत आनंद देण्याचे कामकरता येणे म्हणजे दिवाळी साजरी करणे होय. स्नेहालय परीवारातील अनामप्रेमहि संस्था दिव्यांग पुनर्वसनाचे काम करत आहे. शिक्षण-प्रशिक्षण-रोजगार-पुनर्वसन या टप्प्यात अनामप्रेममध्ये अंध-अपंग-मुकबधीर-अस्थिव्यंग मुले-मुली जीवन निर्माण करीत आहेत.

फटाके अथवा इतर चैनीवर पैसे खर्च करताना आपण अनामप्रेमची आठवण ठेवावी,असे आवाहन अनामप्रेमने केले आहे.आपण अनामप्रेम ला या दिवाळी निमित्त फराळ,कपडे या मदतीशिवाय आर्थिक मदत जरूर करावी, यातून यंदाच्या दुष्काळात पाण्याची समस्या मिटवण्यासाठी अनामप्रेम सत्यमेव जयते ग्राम येथे एक विहीर खणत आहे, याकरिता आर्थिक मदतीची गरज आहे.

अनामप्रेम द्वारा दिव्यांगांचा प्रकाशगान ऑर्केस्ट्रो चालवला जातो.सालाबाद प्रमाणे या संगीत मंच द्वारा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केलेजाते. येत्या ५ नोव्हेंबर ला धनत्रयोदशी दिवशी सकाळी ६.०० वाजता रावसाहेबपटवर्धन स्मारक येथे या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तरी जरूर जास्तीत जास्त नगरकरांनी या कार्यक्रमास सहभाग देऊन दिव्यांगांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन अनामप्रेमच्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.