Breaking News

एक लाखाचा ऐवज पळवला; दोघा भामट्यांनी महिला व्यावसायिकाला लुबाडले


ठाणे : प्रतिनिधी

रस्त्याने पायी निघालेल्या 55 वर्षीय व्यावसायिक महिलेला दोन लाखांचे कोऱ्या कागदाच्या बंडलाचे पार्सल देवून बोलण्यात गुंतवत तिच्याकडील एक लाखांचा सोन्याचा ऐवज पळवल्याची घटना शुक्रवारी सकाळी कासारवडवली नाका येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय दोघा अनोळखी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोडवर राहणाऱ्या 55 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी पायी जात असताना कासारवडवली नाक्यावर 35 वयोगटातील दोघे भामटे भेटले.या भामट्यानी त्यांना बोलण्यात गुंतवून आपल्याकडील दोन लाख ठेवण्यास दिले.तसेच,त्यांच्याकडील सोन्याची माळ आणि सोन्याच्या बांगड्या असा सुमारे एक लाखांचा ऐवज रुमालात बांधण्यास सांगितले.हा ऐवज भामट्यांनी हातचलाखीने लुबाडून तेथून पळ काढला.काही वेळानंतर भानावर आलेल्या महिलेने आपल्याकडील रक्कम तपासली असता केवळ कोऱ्या कागदाचे बंडल असल्याचे आढळले.