राजयोग फाउंडेशन व रोटरी मिडटाऊनने केली दिवाळी गोड.


बीड,(प्रतिनिधी) : राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन मागील तीन वर्षांपासून गोरगरीब लोकांना दिवाळीच्या फराळाचे मोफत वाटप करून ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशा लोकांची दिवाळी खर्‍या अर्थाने गोड करत आहे. रविवार दि.४/११/२०१८ रोजी २००० कुटुंबियांना दिवाळीच्या फराळाचे मोफत वाटप ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभ आशिर्वादाने, पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धूत, रोटरी मिडटाऊन चे अध्यक्ष.डॉ.रो.सुरेंद्र बजाज, सचिव रो.अभिजीत ठाकूर, बंडुभाऊ कदम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभव स्वामी, राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष, तथा नगरसेवक शुभम धूत, रोटरी डिस्ट्रिक.३१३२चे डी.जी.एन. रो.हरीष मोटवणी, यांच्या हस्ते संपन्न झाला. पाली येथील इन्फंट, सेवाश्रम, वृंदावन वसतिगृह, कामधेनु वृद्धाश्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, पसायदान, विहान संस्था येथे ही फराळ व साहीत्य देण्यात आले. दिवाळीचा सण म्हणलं की दिव्यांची आरास,सगळीकडे झगमगाहट, फराळाची रेलचेल असते, पण आजही समाज्यामध्ये असे वंचित वर्ग आहे की त्यांना त्यांना दिवाळी हा सण साजरा करणे म्हणजे एक यक्षप्रश्न असतो त्यांना रोज काम करून पोट भरावे लागते. 

अश्या गरीब लोकांची दिवाळी गोड करण्याचा मानस रोटरी मिडटाऊन चे अध्यक्ष.डॉ.रो.सुरेंद्र बजाज,सचिव रो.अभिजीत ठाकूर व राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शुभम धूत यांनी मनात आणला व तो आज सिद्धीस नेला. यावेळी बोलताना राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष.तथा नगरसेवक शुभम धूत, रोटरी मिडटाऊन चे अध्यक्ष. रो.सुरेंद्र बजाज, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभव स्वामी यांनी मनोगत मांडले. या फराळ वाटपाचे कुपन्स सर्व गोरगरीब,अपंग वंचित लोकांना स्वतः रोटरी मिडटाऊनच्या सदस्यांनी व राजयोग फाउंडेशन च्या सर्व पदाधिकार्‍यांनी घरी जाऊन वाटली होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.नितीन गोपन यांनी केले तर प्रास्ताविक रो. सूर्यकांत महाजन तर आभार प्रदर्शन रोटरी मिडटाऊन चे सचिव. रो. अभिजितसिंह ठाकूर यांनी मानले. या कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी सर्व रोटरी मिडटाऊन चे सदस्य व राजयोग फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मागील एक महिन्यापासून अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget