Breaking News

पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग; गावामध्ये संतापाची लाट


शिक्षकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बोळावी इथं घडली आहे. सुनील कांबळे असं या नराधम शिक्षकाच नावं आहे.

सुनील कांबळे या शिक्षकाने 5 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. यानंतर गावामध्ये संतापाची लाट पसरली. ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेत या आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. या मारहाणीत सुनील कांबळे जखमी झाला आहे.


दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर सुनील कांबळे याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच याप्रकरणी त्याला अटकदेखील करण्यात आली आहे.