राम महाराज झिंजुर्के यांच्या कार्याची धुम


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आख्ेगाव येथील श्री संत जोग महाराज संस्कार केंद्र आखेगाव येथील श्रीराम महाराज यांनी तरूण पिढीवर संस्कार घडावेत म्हणुन गेल्या 15 वर्षापासुन सकल समाजासह बालगोपाळांना अध्यात्मक ज्ञानोबरोबर संत गोरोबांचे धडे देत असुन तरूण टाळकरी तयार करणारे महाराज म्हणुन त्यांची वेगळीच ओळख आहे. एके काळी देहुच्या संत विद्यापिठात संस्कृत व वेदांचे पाठ देणारे नारायण महाराज यांचे सुपत्र राम महाराज घरातुन अध्यात्मिक वारसा लाभलेले राम महाराज वयाच्या नवव्या वर्षा पासुन देहु आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत दाखल झाले. 1980 ते 1982 अखेर बारा वर्षे तेथे अध्ययन केल्यानंतर पुढे 2000 सालापर्यंत आठ वर्षे त्यांनी राज्याच्या विविध भगात भटकंती करूण कीर्तन सेवा केली.

त्यांच्या वडीलांची इच्छा व जन्मभुमीची ओढ होती व समाजासाठी काही करावे अशी तळमळ श्रीराम महाराजांना होती राम महाराजांनां भुकेच्या वेळी दोन घास मिळावेत व अंगभर साधे वस्त्रे असावेत अशी ऐवढी माफक अपेक्षा असल्याने भैतीक सुखाचा व धन संचयाचा लाभ त्यांना शिकवला नाही म्हणुनच कोणापुढे हात पसरण्या ऐवजी आखेगाव येथील स्वतःच्या दोन एकर जमिनीवर 2000 साली शुध्द दसमिला संत जोग महाराज संस्कार केंद्राची सुरवात केली संस्कार केंद्राची सुरूवात पाच विद्यार्थ्यांसह सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात आज सात ते अठरा वयोगटातील हजारो वर विद्यार्थी येथे टाळकरी भजन ओव्या हरिपाठ ज्ञानेश्‍वरी संप्रादायिक अभंगाचे खेळ मृंदुगवादन तसेच व्यसनमुक्ती व संस्कृती जोपासण्याचे पाठ दिले जातात .

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget