Breaking News

नदी पात्रावर सुरु असलेले अंगणवाडीचे बांधकाम बंद करा! राजूर येथील ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी व सीईओंना निवेदन


बुलडाणा,(प्रतिनिधी): येथील राजुर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदीच्या पात्रावर अंगणवाडीचा निर्माण कार्य तत्काल थांबवुन दुसर्‍या ठिकाणी अंगणवाडीचा निर्माण कार्य करण्यात यावे अशी मांगणी राजुर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी बुलडाणा तथा जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांना निवेदन देवून केली आहे. निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे की, राजुर ग्रामपंचायतचे सरंपच व कंत्राटदाराच्या संगमताने नळगंगा धरणात नदीच्या पात्रावर अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. 

यापूर्वी ग्रामस्थानी राजुरचे सरपंच तसेच ग्रामसेवकाकडे यासंदर्भात तोंडी तक्रार केली होती की नदीच्या पात्रावर अंगणवाडीची इमारत बनवू नये कारण सदर इमारत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठिकाणी नाही. पावसाळ्यात नदीला पूर येतात त्यामुळे सदर अंगणवाडी इमारतीला पाण्यामुळे नुकसान होऊ शकते. परंतु सरपंच व ग्रामसेवकाने उडवाउडवीचे उत्तर देवून आम्हा ग्रामस्थाना वेठीस धरून त्याच ठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम सुरु केले असुन अंगणवाडी स्लॅबलेवल पर्यंत पोचली आहे. सदर इमारतीचे देयक व बांधकामाला तत्काळ थांबवून इतर ठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मांगणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी बुलडाणा व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांना निवेदन देवुन केली आहे. 10 ते 15 दिवसाच्या आत जर निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनामध्ये देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी सैयद नफिस सै सलिमोद्दीन, सईद खान जियाउल्लाह खान, शेख शब्बरी, शेख भिकन, सै निजाम रहीमोद्दीन, मिर्झा नईम बेग मोगल बेग, मो.समिर मो.सगीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.