शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानीचे देऊळगाव राजा तहसिलमध्ये ठिय्या आंदोलन


देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): पावसाने दांडी मारल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी वाळून गेली आहे. गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेवून संघर्ष करीत आहे. ऐन पीक बहरात असतानाच पावसाने उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देऊळगाव राजा तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे देऊळगाव राजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, म्हणुन शेतकर्‍यांच्या हितासाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सतिष मोरे यांच्या नेतृवात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन, मका, कपाशी व अन्य पीक वाळून गेले आहे. पावसाचा खंड दोन महिन्यांपेक्षा जास्त असून सोयाबीन, मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे वाळली आहे. अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकर्‍यांपुढे उभी राहिली आहे. दि.3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार यांना स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेराव घालून चर्चा केली. त्यात देऊळगांव राजा तालुक्यातील ग्रामिण भागाच्या दुष्काळी परिस्थितीची सत्य पाहणी करून वस्तुनिष्ठ आणेवारीच्या आधारे तालुका तात्काळ दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा, शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, शेतकर्‍यांची विनाअट कर्जमुक्ती जाहीर करावी, शेतकर्‍यांनी खरिपात भरलेल्या पिक विम्याची नुकसान भरपाई देण्याचे आदेशीत करावे, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. याबाबत निवेदन देवून ठिय्या आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सतिष मोरे, बबनराव चेके, शेख जुलफेकार, जितेंद्र खंदारे, मधुकर शिंगणे, पुंडलिक शिंगणे, गणेश शिंगणे, प्रविण राऊत, पंढरीनाथ म्हस्के, शेख गुलाम नबी, गजानन राईते, रामकिसन शिंदे, किशोर शिंदे, संतोष शेरे, अंदोलनात तालुक्यातील पदाधिकारी व कार्याकर्ते तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget