दीपोत्सवासाठी रंगीबेरंगी पणत्यांचा अनोखा उपक्रम


शेवगाव/प्रतिनिधी 
शेवगाव शहरामध्ये दीपावलीच्या दीपोत्सवसाठी संगीता घोरपडे व महिलांनी एकत्र येऊन मातीच्या पणत्या वर विविध प्रकारची रंगरंगोटी करून कुंदन, आरसा, लेस ,मोती, विविध प्रकारचे धागे वापरुन स्वनिर्मित तयार केलेल्या या पणत्यांना शेवगाव शहरातून मागणी होत आहे. 

औरंगाबाद येथील बीड बायपास या ठिकाणी संगीता घोरपडे या व्यवसायात पारंगत होत्या. औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेऊन त्या या व्यवसायात उतरल्या. त्यांना समशाद शेख, सोनाली परदेशी, अंजुम सय्यद या त्यांना मदत करतात. नागरिकाकडून या दिवाळी सणासाठी आवश्यक असलेल्या या पणत्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने या गोष्टीचा त्यांना मनापासून आनंद होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget