Breaking News

घरांवर लोंबकाळलेल्या विद्युत तारा हटवा! देऊळगाव मही येथे वीज कार्यालयासमोर नागरिकांचे धरणे आंदोलन


देऊळगाव मही,(प्रतिनिधी): येथील वार्ड क्रमांक पाच मधील झोपडपट्टी वसाहतीतील घरावरील लोंबकाळलेल्या विद्युत तारा दुसरीकडे स्थलांतरित केल्या नाही. या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते तसेच झोपडपट्टी वसाहतीमधील नागरिकांनी वारंवार लेखी तक्रार देऊनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानीसह नागरिकांनी 26 नोव्हेंबर रोजी येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज अभियंता प्रफुल्ल चितोडे यांनी लेखी आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

स्वामी विवेकानंद शाळेला लागून चिखली- जालना महामार्गाला लागून झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीतील अनेक घरावरून 11 केव्ही उच्च दाबाची विद्युत तार गेल्याने या घरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत वीज वितरण कार्यालयाकडे झोपडपट्टी वासीयांनी अनेक तक्रार करूनही वीज वितरणने दखल घेतली नाही. त्यामुळे जीवघेण्या विद्युत तारा हटवण्यात याव्यात, या मागणीसाठी असंख्य नागरिकांनी वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वीज अभियंता चितोडे यांनी लेखी आश्‍वासन दिले. 

आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी पुंडलिक शिंगणे, बबन चेके, वसंतराव दहातोंडे, संतोष शिंगणे,जुल्फेकार शेट, विष्णू देशमुख, गणेश शिंगणे, भगवान मुंढे, समाधान देवखाने, अंबादास बुरकुल, प्रवीण राऊत, समाधान शिंगणे, गोपाल देशमुख, अमोल देशमुख, प्रभाकर झिने, गणेश सोसे, नितीन गवई, ज्ञानेश्‍वर खिल्लारे, कैलास फुल्लरे, दीपक झिने, रवी केवट, इंदूबाई बुरकुल, मिनाबाई बोबडे, लक्ष्मी बुरकुल, लताबाई गोमलाडू, शिवगंगाबाई इंगोले इत्यादी स्वाभिमानी शेतकरी संघटना, विद्यार्थी परिषद व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.