शासकीय दूध शीतकरण केंद्र गेवराई व अंबाजोगाई येथे शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करावे


बीड:- शासकीय दूध योजना बीड अंतर्गत शासकीय दूध शीतकरण केंद्र गेवराई व अंबाजोगाई येथे आयटीआय उत्तीर्ण बी.टी.आर.आय. नोंदणीकृत उमेदवारांची भरती प्रक्रिया सन २०१८ -१९ या वर्षासाठी करण्यात येणार आहे. इच्छुक आय.टी.आय. उत्तीर्ण बी. टी. आर. आय. नोंदणीकृत शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन ुुु.रििीशपींळलशीहळि.लेा या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावे. 

इच्छुक शिकाऊ उमेदवारांनी वरील दिलेल्या संकेत स्थळावर वैयक्तिक माहिती भरून तसेच शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र संकेस्थळावर १ नोव्हेंबर २०१८ ते ५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत अपलोड करावीत. शासकीय दूध योजना बीड अंतर्गत शासकीय दूध शीतकरण केंद्र गेवराई येथे प्रशितन व वातानुकुलीनकरण या व्यवसायाच्या एका शिकाऊ उमेदवाराची भरती करण्यात येणार आहे तर अंबाजोगाई येथे विजतंत्री या व्यवसायाच्या एका शिकवू उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. सदरील व्यवसाय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांनी विहित माहिती संकेतस्थळावर अपलोड करावे, असे उपदुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, बीड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget