Breaking News

आडस येथे शेतकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन


केज (प्रतिनिधी):- आडस आणि परिसरातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना अद्यापही सरकारची मदत न मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी शनिवारी सकाळी आडस येथील शिवाजी महाराज चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते या सरकारने शेतकरी यांना वेठीस धरले आहे हे कसले कसले आले आचछे दिन असा प्रश्न आसरडोहचे माजी सरपंच रवी किरण देशमुख यांनी उपस्थित केला होता. 

शाम आकुसकर, विकास काशिद, राम माने यांनी रास्ता रोको आंदोलनाची माहिती दिली. बाजारचा दिवस असल्याने आम्ही कोणाची अडवून न करता केवळ मदत तात्काळ देण्यासाठी हे आंदोलन केले आहे असे ते म्हणाले. यावेळी शिवाजी खडके, अजय कोकाटे, बालाजी जगताप, शाम पाटील, भारत घुगे, लहू वाघमारे, नितीन साबळे, मच्छिंद्र आकुसकर, राजकुमार घुगे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. शेवटी आडसचे तलाठी देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महावितरणचे अभियंता शिंदे यांनी शेतकजयांसाठी विजेच्या कपातीच्या वेळेत बदल करू असे आश्वासन दिले.