देऊळगाव राजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ ग्रस्त यादीतून देऊळगाव राजा तालुका वगळल्याने येथील शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे. शासनाने चुकीचा सर्व्हे करून शेतकर्‍यांची थट्टा केल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली आहे.त्यामुळे तात्काळ सुधारीत यादी काढून देऊळगाव राजा तालूका दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावा, अन्यथा 13 नोव्हेंबर पासुन तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशरा निवेदनाव्दारे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीदार दीपक बाजड यांना देण्यात आले आहे. नुकतेच शासनाने महाराष्ट्रात काही भागात दुष्काळ जाहीर केला आहे.मात्र देऊळगाव राजा तालूका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला असल्याने येथील शेतकरी,कष्टकरी,विध्यार्थी,बेरोज,बेरोजगार युवकांवर एक प्रकारचा अन्याय शासनाने केला आहे.देऊळगाव राजा तालुक्यात यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे.खराब हंगामात दमदार पाऊसाचे आगमन न होऊ शकल्याने सोयाबीन,मका,कापशी ही पिके करपून नष्ट झाली आहेत.पावसा अभावी हता-तोंडाशी आलेली पिके गमविण्याची वेळ शेतकर्‍यांवर अली आहे.परिणामी परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा?हा गंभीर प्रश्‍न सध्या शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.तसेच तालुक्यातील संत चोखा सागर खडकपूर्णा धरणातील जलसाठा पावसाअभावी नगण्य अवस्थेत पोहचल्याने त्याचा पिण्याच्या पाण्यावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे.जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चार्‍याची भीषण समस्या बळीराजा पुढे उभी राहिल्याने ते जनावरे वाटेल त्या भावात व्यापार्‍यांना विकत आहे.असे असतांना देखील देऊळगाव राजा तालूका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळण्यात आला आहे.शासनाने येथील भागाचा सर्व्हे करून सुद्धा देऊळगाव राजा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला नसल्याने शेतकर्‍यांची थठा करून अपेक्षा भंग केली आहे. शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून देऊळगाव राजा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जाहीर खान, अजमत खान, विनोद खार्डे, आयाज खान,अनिस खान, शंकर शिंदे, मदन डुकरे यांच्या स्वाक्षर्‍या आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget