केज तालुक्यामध्ये अवैध धंदे तेजीत; पोलिसांचे दुर्लक्ष


केज, (प्रतिनिधी)- केज शहर आणि ग्रामीण भागात मटका,जुगारासह अवैध धंद्यांनी आपले बस्थान बसविले आहे. त्यात कळंब शहरातून आलेल्या व्यावसायिकांनी मटका बुक्या थाटल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायातून गुन्हेगारीला खतपाणी मिळत चालले आहे. तर राज्यात बंदी असलेला गुटखा बाहेर राज्यातून आणून उघडपणे टपर्‍यावर विक्री होत आहे. पोलिसांकडून मात्र फारशा कारवाया होताना दिसत नाहीत. मागील काही महिन्यापासून केज शहर व तालुक्यात मटका जुगार राजरोसपणे सुरू आहे. सर्वत्र मटका बुक्यावर कामधंदे सोडून नागरिक आकड्याचा खेळत आहेत. कमी पैशात जास्तीची रक्कम मिळत असल्याच्या लालचेपोटी तरुण जुगाराच्या आहारी जात आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. पोलीस खात्याकडून मटका जुगाराकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. या व्यवसायाच्या स्पर्धेतून केज आणि कळंबच्या चालकात वादंग आणि गुन्हेगारी वाढत चालल्याचे समोर आले आहे. गुटखा बंदी असताना केज शहरात व ग्रामीण भागात सर्वच टपरीवर खुलेआम गुटखा मीळत आहे त्यामुळे केजमध्ये गुटखा बंदीचे उल्लंघन होत आहे. मटका जुगारावर कारवाई करून गुटखा विक्री बंद करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 
दरम्यान, पोलिसांनी मात्र याकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget