Breaking News

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन शिक्षकांचा मृत्यू; एक जखमी


नागपूर (प्रतिनिधी)ः मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन शिक्षकांना भरधाव गाडीती धडक बसली. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे ही घटना घडली. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन कुटुंबाच्या जीवनात अंधारमय दिवाळी आली. घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागोराव गुंडेराव बनसिंगे (वय 41) व हेमंत भाऊराव लाडे (वय-52) हे दोन शिक्षक दुर्गेश्‍वर चौधरी या आपल्या मित्रासह बुधवारी सकाळी फिरायला निघाले होते. त्या वेळी एम. एच. 31, ईएन 987 या बोलेरो गाडीची तिघांनाही मागून धडक बसली. यात दोघे शिक्षक जागीच ठार झाले. तर दुर्गेश्‍वर चौधरी जखमी झाले. गाडीचा चालक दिलीप परशराम वाघाड याला अटक करण्यात आली आहे. जखमी चौधरी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त हे 3 मित्र एकत्र आले होते. सलग सुट्ट्या आल्याने मित्रांनी काही बेत आखले होते. एरवी कामात व्यस्त असल्याने एकमेकांची भेट होत नसल्याने त्यांनी एकत्र येत सकाळी साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी जाण्याचे ठरवले. त्यातच हा अपघात झाला. घटनास्थळावरून काही अंतरावरच पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेली गाडी जप्त केली आहे.