निमगाव वाघा येथे वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ


अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. तर भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सतर्कता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, बळवंत खळदकर, काशीनाथ पळसकर, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, शुभांगी धामणे, मंदा साळवे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदीप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, मंदाताई डोंगरे, लहानबा जाधव, तुकाराम खळदकर आदी उपस्थित होते. 

देशाचे स्वातंत्र्य व एकात्मतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान न विसरता येणार आहे. देशाचे गृहमंत्री असताना अनेक संस्थाने त्यांनी खालसा केली. अखंड भारतासाठी त्यांनी दिलेले विचार अंगीकारणे ही सामाजिक बांधिलकी असल्याची भावना पै.नाना डोंगरे यांनी व्यक्त केली. किसन वाबळे यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणांनी परिसर दणानून निघाला. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, व ग्रामसेविका अंजुम शेख यांचे मार्गदर्शन लाभले

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget