Breaking News

स्वाभिमानीकडून बळीराजाप्रति कृतज्ञता रविकांत तुपकरांनी केली शेतकरी, बैलजोडी व नांगराची पुजा


बुलडाणा,(प्रतिनिधी): दिवसरात्र शेतात राबराब राबून शेतकरी काबाड कष्ट् करून या देशाला अन्नधान्य् पुरविरविण्याचे काम करतो. तो शेतकरी, बळीराजा आज आत्महत्येच्या उंबरठयावर उभा आहे. सरकार शेतकर्‍यांना दुर्लक्षीत करीत आहे. आणि समाजातील बुध्दीवादी लोकांसाठी शेतकरी नावालाच बळीराजा राहीला आहे. आयुष्य्भर खस्ता खाऊन प्रत्य्क माणसाची भुक भागविणार्‍या बळीराजाला सुखाचे, सन्मानाचे दिवस यावे व बळीराजाच्या कष्टाला सलाम आणि कृतज्ञता व्यक्त् करण्यासाठी आज 8 नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी त्यांच्या बुलडाणास्थित निवासस्थाना समोर शेतकरर्‍यांच्या पउपस्थितीत शेतात राबणार्‍या शेतकर्‍यांचे औक्षण केले व बैलजोडी आणि नांगराची पुजा करून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त् केली. बळीराजा हा लोककल्याणकारी, चारित्र्यवान, रक्षणकर्ता व दानशुर राजा होता. दारात आलेल्या प्रत्यकाला मागेल ते दान करणे हा त्याचा धर्म होता. म्हणून बळीराजाच्या राज्यात सर्व मानव सुखी होता. देवाच्या आधी लोक बळीराजाची पुजा करीत. त्यामुळे विष्णूने वामनाचा अवतार घेवून बळीराजाकडे गेला व राजाला तीन पाउल जमिन मागीतली. बळीराजाने होकार दिला.

वामनाने एका पायाने सुंपूर्ण पृथ्वी व्यापली.दुसर्‍या पायाने आकाश तर तिसरा पाय कोठे ठेवू असा प्रश्‍न् बळीराजाला केला. यावर बळीराजाने डोक्यावर पाय ठेव असे सांगीतले. आणि वामनाने बळीराजाला कपटाने पाताळात धाडले. अशी ही अख्यायीका आहे. तेव्हा पासून ‘ईडा पिडा टळो, आणि बळीचे राज्य् येवो’ अशी म्हण् रुढ झाली. आत्र अजूनही बळीचे राज्य् आले नाही. बळीराजा सुखी झाला नाही. सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकर्‍याप्रती सरकारची अससलेली अनस्था त्यातून कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या यामध्ये बळीराजा होरपळत आहे. अशा या काबाडकष्ट् करणार्‍या बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त् करण्यासाठी बलीप्रतीपदेच्या दिवशी 8 नोव्हेंबर रोजी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, सौ.शर्वरी तुपकर यांनी त्यांच्या बुलडाणा येथील निवासस्थानासमोर शेतात राबणारे शेतकरी विजय बाहेकर, सदानंद पाटील, कैलरा जाधव या शेतकर्‍यांचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला व बैलजोडी व नांगराची पुजा केली. यावेळी स्वाभिमानीचे राणा चंदन, शे. रफिक शे. करीत, कडूबा मोरे, निलेश राजपूत, विलास गोसावी, संदिप जेउघाले, सैय्द वशीम, महेंद्र जाधव, मनोज जैस्वाल, दत्ता जेऊघाले, बादशाह खान, बबलु चौधरी, संदीप जेऊघाले, परमेश्‍व्र जाधव, रामेश्‍व्र जाधव, सुपडा बाहेकर, गोटू जेऊघाले यांच्यासह शेतकरी मोठया संख्येनी उपस्थित होते.