Breaking News

दिवाळीच्या तोंडावर तरी पिक विमा व बोंड आळीचे अनुदान द्यावे


परळी (प्रतिनिधी) सरकारने जाहीर केलेले बोंड आळी अनुदान व पीक विम्याची रक्कम किमान दिवाळीच्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर तरी द्यावी या मागणीसाठी कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला असून २ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा.टी. पी. मुंडे(सर) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावे लागेल असा इशारा कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसच्या वतीने दिला आहे. यासंदर्भात आज कॉंग्रेसच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की ,भाजपाचा राज्य सरकारने बोंड आळीचे अनुदान केवळ जाहीर केले परंतु आठ महिने नंतरही शेतकर्‍यांना ते मिळाले नाही घोषणाबाजी करण्यात प्रसिद्ध असलेल्या या सरकारने केवळ स्वतःची थोपटून घेतली व शेतकर्‍यांच्या पदरी मात्र निराशाच पडली. 

हीच परिस्थिती पिक विमा च्या बाबतीत झाली आहे गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणारा बीड जिल्ह्यातील शेतकरी या वर्षी तर अधिकच संकटात सापडला आहे असे असताना सुद्धा मंजूर झालेला पिक विमा बीड जिल्हा मध्यवर्ती बँक अद्याप वाटप करीत नाही राज्य सरकार व बँकेचे पदाधिकारी साटेलोटे करून शेतकर्‍यांना आर्थिक संकटात पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत ही अतिशय गंभीर व दुःखद बाब आहे. सध्या दिवाळीसारखा महत्वाचा सण तोंडावर आहे यापूर्वी तरी सरकारने पीक विम्याची रक्कम व बोंड आळीचे अनुदान शेतकर्‍यांना वाटप करावे व त्यांची दिवाळी गोड करावी अन्यथा कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसच्या वतीने अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा टी .पी. मुंडे( सर )यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर २ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रा विजय मुंडे, यांच्यासह जि .प .सदस्य प्रदीप भैय्या मुंडे,परळी विधानसभा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मनोज संकाये, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल कांदे ,शहराध्यक्ष किशोर जाधव ,अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जम्मु सेठ, शहराध्यक्ष बबलू सय्यद साजेद, यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी केले आहे