२० लिटर गावठी दारूसह एकाला अटक


ठाणे : प्रतिनिधी

20 लिटर गावठी दारूचा फुगा बाळगणाऱ्या 52 वर्षीय आरोपीला डायघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे 2 हजार रुपये किंमतीची गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.


अटक आरोपी दशरथ विष्णू म्हात्रे(52) रा. मोडी देसाई गाव पोस्ट -पडले, जि-ठाणे. याने वाहनावर 20 लिटर गावठी दारूचा फुगा घेऊन जात असताना डायघर पोलिसांनी मोडी देसाई हनुमान मंदिर समोर सार्वजनिक रोडवर अटक केली. त्याच्या विरोधात फिर्यादी अण्णासाहेब एडके नेमणूक डायघर पोलीस ठाणे यांनी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget