पारंपारिक प्रथेचे औचित्य साधुन महिलांना साडी-चोळी वाटप


पाथर्डी/प्रतिनिधी
दीपावली व पाडवा या सणाला भारतीय संस्कृती मध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असुन या सणाचे महत्व इतर सणापेक्षा जास्त असुन. या सणानिमीत्त देशात आई आणि बहिणीला साडी चोळी घेण्याची पारंपारिक प्रथा असुन याचे औचित्य साधत व स्व.माजी आमदार राजीव राजळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नगरसेवक दीपाली बंग व माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी प्रभागातील महिलांना कुटुंब मानत साडी चोळी वाटप करण्याची केलेली प्रथा,आगामी काळातही बंग दाम्पत्याने अविरतपणे सुरू ठेवावी असे प्रतिपादन ह.भ.प.मुकुंद महाराज जाटदेवळेकर यांनी केले. मा.नगरसेवक रामनाथ बंग व नगरसेविका दिपाली बंग यांनी मा.आ.स्व.राजीवजी राजळे यांचे पुण्यस्मरण व दिपावली सणानिमीत्त प्रभाग क्र.7 मधील सर्व धर्मीय महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम कालिका देवी मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जाटदेवळेकर महाराज बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शंकर महाराज मठाचे प.पु.माधवबाबा, ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर,प.पु. सिद्धीसुधाजी महाराज, प.पु.सुविधीजी महाराज,प.पु.सुमितीजी महाराज, नगरसेवक प्रसाद आव्हाड, नामदेव लबडे, प्रविण राजगुरु, नगरसेवक संगिता गटाणी, मंगल कोकाटे, सुरेखा गोरे, प्रियंका काळोखे, भाजपा महिला आघाडीच्या ज्योती मंत्री, सुंदरमामा कांबळे, आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ह.भ.प.जाटदेवळेकर महाराज म्हणाले की, स्व.राजीवजी राजळे यांच्या विचारांना अभिप्रेत असणारा हा उपक्रम आहे. सर्व जाती धर्मातील महिलांचा आज सन्मान केला जात असल्याने सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला आहे. विविध सण उत्सव हे सर्वांसाठी सारखेच असतात. ते एक समानपणे साजरे होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. दुष्काळाचे सावट असताना अनेक जणांना सण साजरे करणेही अवघड झाले असुन बंग दाम्पत्यकडून नविन साडीची भेट मिळल्याने महिला समाधानी दिसत होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली बंग यांनी सुत्रसंचलन नितीन गटाणी, यांनी करुन आभार शुभम राऊत यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget