पाणीवाटप कायदा तुटवडा असेल तर लागुः तूट असल्यास नाही


सोनई/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने सन 2005 साली केलेला समन्यायी पाणी वाटप कायदा पाणी तुटवडा असताना लागू होतो पाण्याची तूट असताना लागू होत नाही असे मत फुले शाहू आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर वैरागर यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की जायकवाडी धरणात 57 टक्के पाणीसाठा असून तूट 8 टीएमसी असताना पाणीसाठा 56 टक्के दर्शवण्यात आलेला असून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून 9 टीएमसी पाण्याची मागणी केल्याने 1 टीएमसी पाणी जास्त गेले आहे. तसेच 8 टीएमसी पाण्यात अहमदनगर जिल्ह्याचा हिस्सा दर्शवण्यात आलेला नाही. 

सध्या स्थितीत जायकवाडी धरणात निम्म्यापेक्षा जास्त पाणीसाठा असून समन्यायी कायदा 2005 पाणी तुटवडा असताना लागतो तूट असताना लागत नाही. कार्यकारी संचालक यांनी जायकवाडी धरणात पाण्याची तूट असताना समन्यायी कायदा 2005 चा चुकीचा अर्थ लावलेला असल्याने त्यांच्याकडून पारित केलेला हा आदेश महाराष्ट्र शासनाने तात्काळ रद्द करून पाणी सोडण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी. अशी मागणी सुधीर वैरागर यांनी केली आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget