वाठारस्टेशन पाणी योजनेचा अध्यादेश ग्रामपंचायतीस सुपूर्द


वाठारस्टेशन (प्रतिनिधी) : वाठारस्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील प्रमुख आणि महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे शाळा, हॉस्पिटल, महाविद्यालय,राष्ट्रीयकृत बँका, मोठी बाजारपेठ यांचा समावेश होतो. त्यामुळे वाठार स्टेशनला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

असे असताना मात्र, या गावाला उत्तर कोरेगाव तालुक्यातील कायम दुष्काळी गाव म्हणूनही ओळखले जाते. परंतु आता हा कायम दुष्काळी नावाचा कलंक पुसला जाणार आहे. आणि तोही माजी पंचायत समिती सदस्य अंकुशकाका जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते नागेशशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखालील असणार्‍या या ग्रामपंचायतीच्या काळात, बरीच वर्षे झाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून नळपाणी पुरवठा योजनेसाठी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण तसेच जि. प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून गावाला या योजनेचा अध्यादेश आमदार दीपक चव्हाण व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आला.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते नागेशशेठ जाधव, ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब जाधव, मा.उपसरपंच संजय भोईटे, बळीराम काळोखे, दत्तात्रय जाधव, ग्रा.सदस्य महेश लोंढे, ऋषीसेन जाधव, शाहीद मुलाणी, संजय शिरसवडे, निवृत्ती करे, संभाजी माने, दादा घोंगडे, अरुण भोईटे, जब्बार शेख, कमरुद्दीन मुलाणी, अलीम सय्यद, अशपाक शेख, शब्बीर शेख, हाफिज पटेल, इर्शाद मोमीन, ग्रामविकास अधिकारी ढाणे, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेशशेठ जाधव यांनी केले.

नळपाणी योजना मंजूर करण्यासाठी आम्ही व आमच्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आहे. रात्रीचा दिवस करून या नळपाणी पुरवठा योजनेसाठी अविरतपणे झटत आहोत. आज गावातील नागरीकांच्या साक्षीने आमदार चव्हाण व जि. प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे या योजनेचा अध्यादेश स्वतः घेऊन ग्रामपंचायतीस सुपूर्द केला. आम्ही वाठार स्टेशन नागरिकांच्या विकासासाठी व प्रगतीसाठी नवनवीन संकल्पना मांडत आहोत. लवकर याही अंमलात आणल्या जातील. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget