नगर दक्षिणेची जनता बाहेरील पार्सल कधीही स्वीकारणार नाही: मुरूमकर


जामखेड/ता.प्रतिनिधी
डॉ सुजय विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील जातेगाव, मोहरी पिपंळगाव, आवळा, हळगाव, पाटोदा या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले मात्र हि सर्व कामे पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी मंजूर केली असल्याने सुजय विखे पाटील यांनी कामाचे श्रेय लाटू नये अशी टीका पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे. 

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, जामखेड तालुक्यातील जातेगाव, मोहरी, पिपंळगाव आवळा, हळगाव, पाटोदा येथील विकास कामे ही प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुरवठ्यामुळे मंजूर झाली असून पालकमंत्री शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सर्व डी. पी. डी. सी. कामांचा निधी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर होतो, जामखेड तालुक्यातील सर्वच कामांचा निधी प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने प्राप्त झाला असून अशा कामाचे भूमिपूजन करण्याचा अधिकार सुजय विखे यांना नाही, विखे हे अद्याप ग्रामपंचायत सदस्य नाहीत पालकमंत्री शिंदे यांची कामे व उंची मोठी आहे त्यांच्यावर टीका करण्याची योग्यता सुजय विखे यांची नाही विखे यांनी भाषणात सांगितले कि पालकमंत्री शिंदे 60 हजारांच्या मताधिक्क्याने पराभूत होतील, परंतु आमची निवडणुकीसाठी कधीही तयारी आहे, निवडणूक कधीही होऊन द्या समोर उमेदवार कोणीही असू द्या पालकमंत्री शिंदे हे 50 हजाराच्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त करून पालकमंत्री शिंदे यांचे पाय जमिनीवर आहेत ते सतत जनतेमध्ये असतात, कर्जत-जामखेड मतदार संघात गेल्या 50 वर्षात कधी नाहीत ते कोट्यवधीं रुपयांचे विकास कामे चालू आहेत, नगर दक्षिणेची जनता बाहेरील पार्सल कधीही स्वीकारणार नाही हा भाजपचा बालेकिल्ला आहे तो तसाच अबाधित राहणार आहे, सुजय विखे यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये, निवडणूक रिेंगणात भाजप सेनेची ताकद दाखवून देऊ यापुढे प्रा.राम शिंदे यांच्यावरील टिका खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा माजी सभापती भगवान मुरूमकर यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget