दोन लाखांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न फसला


कराड (प्रतिनिधी) : उभ्या असलेल्या कारची काच फोडून आतमध्ये ठेवलेले दोन लाख रुपयांवर डल्ला मारण्याचा चोरट्यांचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. हा प्रकार येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. 

याबाबतचे सविस्तर वृत्त, असे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेरे, ता. कराड येथील निकम हे गौण खनिज महसुलाचे दोन लाख रुपये भरण्यासाठी बँकेतून पैसे काढून त्यांच्या बलेनो मोटर कारमधून येथील तहसीलदार कार्यालयात आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निकम यांनी कार तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यालगत पार्क केली होती. यावेळी त्यांना त्यांचे मित्र त्या ठिकाणी भेटल्याने निकम मित्रांसमवेत चहा पिण्यासाठी नजीकच असलेल्या हॉटेलमध्ये गेले. दरम्यान, कारजवळ काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूचे लोक कारच्या दिशेने धावले. त्या ठिकाणी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी गर्दीला पाहून तात्काळ घटनास्थळावरून पोबारा केला. संबंधित युवकांनी काच फोडून कारमधील काहीतरी चोरण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यावर निकम म्हणाले, मी आताच बँकेतून गौण खनिजचा महसूल जमा करण्यासाठी दोन लाख रुपये काढून आलो आहे. हीच रक्कम पुढच्या शीटच्या डाव्या बाजूला असलेल्या डिक्कीत ठेवली होती. चोरट्यांनी याच दोन लाखावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच फुटल्याचा आवाज आणि नागरिक सावध झाल्याने चोरटे पसार झाले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget