Breaking News

महात्मा फुले हे सामाजिक चळवळींचे केंद्र : गिरी

कुळधरण/प्रतिनिधी
महात्मा फुले हे शेतकरी, कष्टकरी आणि स्त्रीयांच्या चळवळींचे केंद्र होते असे प्रतिपादन प्रा. श्रावण गिरी यांनी केले. कुळधरण येथील विजय प्रतिष्ठानच्या छत्रपती पब्लिक स्कुलमध्ये महात्मा फुले स्मृतीदिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नवनाथ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रा. गिरी पुढे म्हणाले, प्रवाहाविरूध्द लढणारे महात्मा फुले हे समाजसुधारकांचे प्रेरणास्थान होते. शेतकरी, कष्टकरी आणि स्त्रियांना न्याय देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. विधवांचे पुनर्विवाह, केशवपणाला त्यांनी वेळोवेळी विरोध केला. सावित्रीबाईंच्या मदतीने त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रोवला. 

यावेळी नगरपालिका करनिर्धारक पदी निवड झाल्याबद्दल नवनाथ जगताप यांचा सत्कार करण्यात आला. विश्‍वा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अनुमोवा पवार यांनी प्रास्ताविक तर के.आर घालमे यांनी आभार मानले. यावेळी रमेश पवार, सचिन बाराते, गणेश चव्हाण, प्रेमलता शिंदे, गणेश पवार, राहुल घालमे, रमाकांत गजरमल, बिभीषण पाटील, सतीश सुपेकर, गणेश सुपेकर, सुदाम सुद्रिक, पार्वती हांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


राशीनला अभिवादन...
राशीन येथील संकल्प वसतीगृहात महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय भोसले, प्रणिता भोसले तसेच वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.