‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे भव्य लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच पुतळयाचे अनावरण


नवी दिल्ली : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143 वी जयंतीचे औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले की, सरदार पटेलांनी देश एकसंध करण्याचे कार्य केले.

 त्यांनी हे केले नसते, तर आज भारतीयांना गीरच्या जंगलातील सिंह पाहण्यासाठी आणि सोमनाथ मंदिरात जाण्यासाठी तसेच, हैदराबादचा चारमिनार पाहण्यासाठी व्हिसा घ्यावा लागला असता. देशाला एकसंध करणार्‍या या महापुरुषाला त्याच्या योग्यतेचा सन्मान मिळणे आवश्यकच होते. त्यांनी दाखविलेल्या पुरुषार्थाचा हा सन्मान आहे. मोदी पुढे म्हणाले की, आज भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. सरदार पटेलांचा पुतळा देशातील अभियांत्रिकी आणि देशाच्या तांत्रिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. या पुतळ्यामुळे येथील बांधवांना रोजगार मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रात संधी निर्माण होणार आहेत. सरदार पटेल यांचा पुतळा शेतकर्‍यांच्या सन्मानाचे प्रतीकही आहे. काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, आम्ही महापुरुषांचा सन्मान केला, तर त्याकडेही लोक संशयाने पाहतात. काही लोक आम्ही केलेल्या प्रत्येक बाबीकडे राजकारण करत असल्याचा दृष्टिकोनातून पाहतात, तेव्हा मी आश्‍चर्यचकित होतो. 

स्टॅच्यू ऑफ युनिटीची वैशिष्टे 

- 7 मजली इमारतीएवढी चेहर्‍याची उंची
- 7 फूट हात, 85 फुटांपेक्षा अधिक पायांची उंची
- 1 व्यक्तीच्या उंचीएवढे मोठे ओठ, डोळे, शर्टची बटणे
- स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या जवळ फ्लावर व्हॅली आहे 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget