सक्शन पॅम्पने बेकायदेशीर रेती उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल


ठाणे : प्रतिनिधी

देसाई खाडी किनारी चुहाब्रिज लगत दिवा-मुंब्रा खाडी किनाऱ्यावर सक्शन पंपद्वारे रेतीचे उत्खनन करीत असल्याच्या माहितीनुसार मुंब्रा मंडळ प्रभारी अधिकारी अरुण कासार यांनी अवैध रेती उत्खनन प्रकरणी अश्फाक फाजल खान व इतरा विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


मुंब्रा मंडळ प्रभारी अधिकारी अरुण कासार याना मिळालेल्या माहितीच्या आधारे चुहा ब्रिज खाडी किनाऱ्यावर सक्शन पंपद्वारे रेती उत्खनन करून कांदळवणाचे नुकसान करीत असल्याचे निदर्शनास आले. माहितीद्वारे सदर रेती उत्खनन हे रेती माफिया अश्फाक फाजल खान व इतर लोक करीत असल्याच्या माहितीवरून कासार यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget