Breaking News

योगामुळे आत्मविश्‍वास वाढतो : डॉ.वैशाली पडघान


बुलडाणा,(प्रतिनिधी): आयुर्वेदाचा स्विकार, व्यायामाची जोड आणि आहाराची साथ असली तर निरोगी आयुष्य चांगल्या पध्दतीने जगता येते.आयुर्वेदात आपला आहार कसा असावा ह्याचे मार्गदर्शन केले आहे. चुकीचा आहार घेतल्या अनेक व्याधींची लागण होवु शकते. आहारा सोबतच योग व व्यायामाची आवश्यकता प्रत्येका आहे. योगाभ्यास केल्याने शरिरातील रक्ताभिसरण चांगल्या रितीने होते.नियमीत योग केल्याने त्वचेअवर तेज येते. त्यामुळे महिलांना फेशियर करण्याची आवश्यक भासत नाही. आहारातील साखर जर वर्ज केली तर अनेक व्याधी पासुन दुर राहण्यास मदत होते साखरे वजी फळेम खारीक, सुका मेवा यासारखे पदार्थ मर्यादित प्रमाणात सेवन करण्यास हरकत नसते. नियमित योग केल्याने आपल्यातील आत्मविश्‍वास देखील वाढतो.महिलांनी धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी आपण घेण्याची गरज आहे. असे मत डॉ. वैशाली पडघान यांनी योगोपचार कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष पदावरुन बोलतांना व्यक्त केले.

 महाराष्ट्र राज्य महिला आयोग व विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्था बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने योगोपचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते..याप्रसंगी उदघाटक म्हणुन बोलतांना मृणालीनी सपकाळ म्हणाल्या की घरातील महिलांवर कुटुंबाचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी असते, ती त्या समर्थपणे पार देखील पाडतात पण हे सगले करत असतांना आपल्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते त्यासाठी आपण आपल्या काही बाबी नियमित करणे आवश्यक आहे. योग व प्राणायाम हा एक संस्कार आहे. घरातील महिलांनी यात पुढाकार घेतला तर सगळ्या कुटुंबाला याची सवय लावु शकता व यामाध्यमातुन आपल्या कुटुंबा सोबतच आपला समाज सुदृढ होइल. यावेळी शहिणा पठाण,श्रीमती डॉ विजया काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अंजली परांजपे यांनी सांगीतले की, उत्तम आरोग्य असेल तर जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आनंद सहजरिता घेता येतो.योगाभ्यासाने मन,बुध्दी यावर चांगले संस्कार होतात. या कार्यशाळेच्या माध्यमातुन आरोग्यमय कुटुंब आरोग्य संपन्न बुलडाणा व्हावे यासाठी बुलडाणातील सगळ्या महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. संस्थेच्यावतीने घेण्यात येणार्या योगवर्गाचा सर्व महिलांनी लाभ घ्याव असे आवाहान देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायत्री महाजन यांनी तर आभार प्रदर्शन माया महाजन यांनी केले या योगोपचार कार्यशाळेस महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.